ग्रामपंचायत तिवसाघाट अंतर्गत झालेली तंटामुक्ती गाव समिती निवडणुक मध्ये अध्यक्षपदी ३०६ मतांनी दिनेश नामदेव भोदे विजय

Thu 10-Oct-2024,09:00 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधि रवी वाहणे शेदूर्जनाघाट

 

वरुड तालुक्यातील तिवसा घाट येथील ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली त्या निवडणुकीकरिता आठ पात्र उमेदवारांनी अर्ज सादर केला होता तसेच ही निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय ग्रामपंचायत ने ठरविले नंतर तेथे असणारे गावकरी मंडळींनी मतदान केले एकूण मतदान हे 578 झाले व त्यापैकी दिनेश नामदेवराव भोदे यांना ३०६ मते मिळाली, निलेश नथुजी पाटील याला एकूण 18 मते मिळाली तसेच रत्नाकर संपतरावजी चौकीकर यांना 36 मते मिळाली तसेच वसंत पाटील यांना एकूण 80 मते मिळाली तसेच भावना अतुल बागडे यांना 64 मते मिळाली तसेच अब्दुल गफूर अब्दुल रशीद काजी यांना 53 मते मिळाली तसेच सुभाष सदाशिव नागले यांना सह मते मिळाली व रेखा शिवदास झारखंडे ही निरंक राहिली व 15 मते नकार म्हणून आले अशी एकूण 578 पैकी या निवडणुकीत दिनेश नामदेवराव भोदे या तरुणाने 306 मध्ये घेऊन विजय मिळवला. सदर निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सचिव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी पोलीस पाटील व संपूर्ण मित्र मंडळ आणि गावातील नागरिक यांनी अभिनंदन केले व दिनेश भोदे यांनी संपूर्ण गावकऱ्यांचे व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे शब्दशः आभार मानले